Dharma Sangrah

पुण्यात गुंडांचा पुन्हा राडा, दहशत माजवत फोडल्या अनेक गाड्या

Webdunia
परिसरात दहशत माजवण्यासाठी किंवा भांडणाचा वचपा काढण्यासाठी पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड केलेच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अश्या पद्धतीने  एका टोळक्याने धारदार शस्त्राने ५ ते ६ वाहनांची तोडफोड केली असून घटना मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमागील परिसरात घडली आहे. या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्र हातात घेत या  परिसरात आरोडाओरड करत दहशत माजवण्याचा जोरदार प्रयत्न केला. 
 
तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या काचांवर दगड फेकून आणि धारदार शस्त्राने वार करून नुकसान केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या नागरिकांमधून पोलिसांमध्ये तक्रार देण्यास कोणी पुढे आले नाही.मागील काही दिवसापूर्वी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमद्ये १० ते १५ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री मंगळवार पेठेत ही घटना घडली आहे. 
 
पुणे शहराच्या उपनगर भागात गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार घडत असताना शहराच्या मध्यवस्तीमध्य असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्य भितीचे वातावरण आहे. या घटनेची फरासखाना पोलिसांनी दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या घरातून एनटीएची गोपनीय कागदपत्रे जप्त

नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CBSE 12th Revaluation 2026: सीबीएसई बोर्डाने स्कॅन केलेल्या प्रती मिळवण्याची तारीख वाढवली, आता २५ मे पर्यंत अर्ज करता येईल

४२ नवरदेव नटूनथटून आले, पण तिथे ना मंडप होता, ना नवरी; मध्य प्रदेशात लग्नाच्या नावाखाली विचित्र सामूहिक फसवणूक

पुढील लेख
Show comments