Festival Posters

नाशिकमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:37 IST)
नाशिकमधील  एका कॉलेजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयात  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
 
श्रुती सानप (२२)  असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती हि नाशिकमधील सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या महाविद्यालयात ती बीएचएमएसच्या  तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. श्रुती कॉलेजवळ असणाऱ्या वसतिगृहात राहायला होती.
 
दरम्यान काल दुपारच्या सुमारास श्रुतीची मैत्रीण पायल घाटोळ ही रूमवर गेली असता दरवाजा बंद होता. यावेळी पायल हिने आवाज देऊनही श्रुतीने दरवाजा उघडला नाही. रूममधून काहीच प्रतिसाद येत नसल्याने तिने दरवाजाच्या जाळीतून आत पाहिले असता श्रुतीने फाशी घेतल्याचे दिसून आले.
 
या घटनेची माहिती तिने शिक्षक दिनार सावंत यांना दिली. सावंत यांनी घटनास्थळी पोहचून दरवाजा तोडला. यावेळी श्रुतीने सिलिंग फॅनला ओढणीच्या साहायाने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून या प्रकरणी पंचवटी पोलिसांचा तपास सुरु आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे निर्णय: फडणवीस सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय, संत्र्यावरील आयात शुल्क परतावा योजना रद्द

६० वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात पडली २२ वर्षांची तरुणी; गावकऱ्यांनी मंदिरात लावून दिले लग्न

LIVE: मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात होणार, बीएमसीने सतर्कतेचा इशारा दिला

मुंबई इंडियन्सने पंजाबकिंग्सला ६ गडी राखून पराभूत केले

पुढील लेख
Show comments