Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक, आमदार कोकाटेनी घेतली दखल

Webdunia
मंगळवार, 4 एप्रिल 2023 (21:32 IST)
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही दिवसांपूर्वी टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपये घेऊन पसार झाल्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करत बाजार समिती प्रशासनास निवेदन दिले होते.त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्यांसाठी सिन्नरचे आमदार ॲड.माणिकराव कोकाटे यांनी बाजार समिती सचिवांची भेट घेतली असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना मदत करा, असे त्यांनी सांगितले आहे.
 
पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे नाशिक तालुक्यासह सिन्नर, कळवण, दिंडोरी शहरालगतच्या खेड्यापाड्यातून टोमॅटो विक्रीसाठी येतात. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी, समशाद फारुकी हे जवळपास १७९ शेतकऱ्यांचे १ कोटी ८० लाख रुपये घेऊन पसार झाले आहेत.
 
या प्रकरणात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आमदार ॲड. कोकाटे आणि समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्य बाजार समितीतील सचिव अरुण काळे यांची भेट घेतली. आमदार कोकाटे आणि बाजार समिती सचिव अरूण काळे यांच्यात चर्चा होऊन ज्या व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे घेणे बाकी आहे, त्या व्यापाऱ्याचे बाजार समिती आवारात असलेले गाळे विक्री करत आलेल्या पैशातून समान हिस्से करत शेतकऱ्यांना वाटप करावे असे कोकाटे यांनी सांगितले.
 
दरम्यान, यानंतर कोकाटे यांनी बाजार समिती कार्यालयातूनच पोलीस आयुक्तांना फोनवरून घडलेल्या प्रकरणाबाबत हकीकत सांगितली. त्यावर पोलीस आयुक्तांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ पोलीस आयुक्तालयात पाठविण्याबाबत सांगितले असून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आमदार कोकाटे यांना दिले.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

अयोध्यातील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

बिअरमध्ये डुंबायचे, बिअरमध्येच पडायचे, पापण्या मिटून जगाला भुलायचे; बिअरबाथ स्पाचा ट्रेंड

ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनी जेवल्यावर थोडं चाललं पाहिजे, वाचा 5 कारणं

कोलकाता येथील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, लोकांना बाहेर काढले

ENG vs OMAN: इंग्लंडची करिष्माई कामगिरी,ओमानचा पराभव केला

AFG vs PNG: अफगाणिस्तानने पीएनजीचा सात गडी राखून पराभव करत सुपर-8 मध्ये प्रवेश केला

पुणे अपघात प्रकरणात विशाल- शिवानी आणि अश्फाकची येरवडा कोठडीत रवानगी

IND vs CAN T20 : T20 मध्ये भारत आणि कॅनडा सामना रंगणार

चंदू चॅम्पियन: भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण विजेते मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट

G-7 गट म्हणजे काय? हा गट युक्रेन आणि गाझामधील युद्ध थांबवू शकतो का?

पुढील लेख
Show comments