Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात तलावातील टॉवरवर अडकून पडली माकडे, बचावकार्य सुरूच

Webdunia
गुरूवार, 21 जुलै 2022 (15:59 IST)
नागपूर- महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील माहुरझरी गावात ‘हाय पॉवर ट्रान्समिशन टॉवर’वर सात माकडे गेल्या 5 दिवसांपासून अडकले आहेत कारण आजूबाजूला पाणी साचल्याने त्यांना टॉवरवरून खाली उतरता येत नाही. आता त्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाने टॉवरजवळ कृत्रिम पूल बांधला आहे.

माकड्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. दोरी आणि बोटीच्या साहाय्याने त्यांना वाचवण्याचे प्रयत्नही करण्यात आले, मात्र यश आले नाही.
 
राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हैत म्हणाले की, बांबूचे पत्रे, काठ्यांचे जाळे, झाडांच्या कोरड्या फांद्या आणि रिकामे ड्रम वापरून पुराच्या पाण्यावर 200 मीटर लांबीचा कृत्रिम पूल बांधण्यात आला आहे. माकडे टॉवरवरून खाली येतील आणि या पुलावरून पाणी ओलांडतील, अशी आशा बचावकर्ते व्यक्त करत आहेत.
 
वनविभाग, नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ आणि वन्य प्राण्यांच्या 'ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर'चे कर्मचारी लंगुरांच्या सुटकेसाठी एकत्रित प्रयत्न करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments