Festival Posters

चिंताजनक : राज्यात एचआयव्हीचे प्रमाण जास्त

Webdunia
शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (11:40 IST)
गेल्या तीन वर्षांत देशात एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र त्याचबरोबर काही राज्ये एचआयव्ही संसर्गाची नवी ठिकाणे म्हणून समोर आली असून महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एचआयव्हीचे प्रमाण जास्त असल्याचे रोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी संसदेत सांगितले आहे. 
 
ते म्हणाले, की इतर राज्यात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असून मेघालय, मिझोराम व त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तीन वर्षांत एकूण एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१५-१६ मध्ये २,००,४६५ जणांना एचआयव्ही बाधा झाली. २०१६-१७ मध्ये हे प्रमाण १,९३,१९५ होते. तर २०१७-१८ मध्ये ते १,९०,७६३ झाले. तीन वर्षांत महाराष्ट्रात एचआयव्हीचे प्रमाण जास्त असून तेथे २०१७-१८ च्या आकडेवारीनुसार  २८,०३० रुग्ण आहेत. मिझोराम, मेघालय व त्रिपुरा या राज्यात एचआयव्हीचा प्रादुर्भाव वाढत आहे कारण तेथे गर्भवती महिलांमध्ये व जोखमीच्या गटात (वेश्या व इतर) एचआयव्हीचे प्रमाण जास्त आहे. देशभरात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असताना या तीन राज्यांत मात्र एचआयव्हीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

बांगलादेश भारतात टी-२० विश्वचषक सामने खेळणार, आयसीसीने मागणी फेटाळली

पालघर मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीला नमाज पठण करण्यास भाग पाडले, रॅगिंगची घटना समोर आली

Swami Vivekanand Jayanti 2026 Speech in Marathi स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप

अकोल्यात काँग्रेस नेते हिदायतुल्ला पटेल यांची दिवसाढवळ्या हत्या; नमाज अदा करुन परतत होते

पुढील लेख
Show comments