Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसूतीमध्ये आई-बाळाचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (10:19 IST)
बीडच्या माजलगावच्या जाजू रुग्णालयात कोणत्याही सुविधा आणि तज्ज्ञांशिवाय एका महिलेची प्रसूती करण्यात आली बाळंपणात जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेचा आणि तिच्या नवजात मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनाली पवन गायकवाड(22) असे या महिलेचे नाव हे. सदर महिला बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खेर्डाची रहिवासी होती. ती आपल्या माहेरी सांडस चिंचोली येथे बाळंतपणाला आली होती. रविवारी तिला त्रास जाणवू लागला आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवार असल्यामुळे कोणतेही डॉक्टर उपलब्ध नव्हते. तिला त्रास होत असल्याची माहिती रुग्णालयातील उर्मिला जाजू डॉक्टरांना देण्यात आली. त्यांनी सोनालीवर तात्पुरते उपचार केले. तरीही तिचा त्रास वाढत होता. ते पाहून तिच्या कुटुंबीयानी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचे डॉक्टरांना सांगितल्यावर डॉ. जाजू यांनी सोनाली एका सामान्य बाळाला जन्म  देईल काही काळजी करू नका. असे सांगितले. रात्रभर त्रास सहन करत नंतर कोणत्याही सुविधा किंवा तज्ज्ञांशिवाय या महिलेची आपत्कालीन स्थितीत प्रसूती झाली तिने सकाळी सातच्या सुमारास एका गोंडस बाळाला जन्म दिला मात्र तिला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्यामुळे तिचा आणि बाळाचा तासाभरातच मृत्यू झाला. या घटनेचा नातेवाईकांना मोठा धक्का  बसला आणि त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. प्रसूती दरम्यान हलगर्जी करण्याचा आरोप सोनालीच्या भावाने केला आहे. माझ्या बहिणीची प्रकृती गंभीर असताना तिच्या कडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी डॉ.वर कारवाई करण्याची मागणी सोनालीच्या नातेवाईकांनी केली आहे. 
 
या प्रकरणी रुग्णालयातील डॉ. जाजू यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चौकशीतून डॉ. उर्मिला जाजू यांच्या कडे प्रसूतीतज्ञ ची कोणतीही पदवी नसल्याचे समजले. या प्रकरणी  त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात येण्याचे सांगण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

कॅन्सरचे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, 2 वर्षानंतर उघडकीस आले

LIVE: काँग्रेस नेते भाई जगतापच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा हल्लाबोल

भाई जगतापविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार, असा अपमान सहन करणार नाही म्हणाले किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments