rashifal-2026

मुंबई थंडी वाढली! कमी तापमानाची नोंद

Webdunia
सोमवार, 16 जानेवारी 2023 (14:47 IST)
मुंबई : मुंबईत हुडहुडी वाढली आहे. या वर्षीच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत आज (दि. १६) सकाळी पारा १३.८ अंशावर पोहोचला होता. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत १५ ते १७ जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून मागील आठवड्यात वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.
 
दरम्यान, मुंबईत रविवारी (दि. १५) दिवसाच्या कमाल तापमानामध्ये देखील घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान २५ डिसेंबर रोजी १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर आज १३.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
 
मुंबईची हवा आज दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीमध्ये गेल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे हवा प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळाले. मुंबईतील तापमानामध्ये घट झाल्यानंतर शहरामधील हवा गुणवत्ता पातळी कमालीची खालवली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यापुन्हा एकदा डोके वर काढू शकतात. मुंबईतील किमान तापमानामध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी अशी नोंद बघायला मिळाली आहे. मुंबईतील किमानतापमान १३.८ अंशांवर गेल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट स्थिती गेल्याची बघायला मिळाली. दिल्लीपेक्षा देखील जास्त मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचे सफरच्या नोंदीनुसार पाहायला मिळाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments