Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पर्यटकांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2017 (11:22 IST)

गटारीनिमित्त मजामस्ती आणि पावसाळ्याचा आनंद लुटताना राज्यभरातील सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात कसारा, नेरळ, कर्जत, वाशिंद आणि अलिबागमध्ये धबधब्यांवर बुडून सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

कसाऱ्याजवळ अशोका धबधब्यात पाय घसरुन बाळासाहेब गोडसे हा तरुण तीनशे फूट उंचावरुन कोसळला. नेरळ येथील आनंदवाडी धबधब्यात मुलुंड येथील सुरेश चेंचकर याचा बुडून मृत्यू झाला, तर कर्जतच्या पाली भुतवली धरणात बुडून मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू झाला.

वासिंद येथे दहागाव जंगलातील नाल्याच्या बंधाऱ्यावर पर्यटनासाठी मुंबई महापालिकेतील 18 कामगार मित्र आले होते. या बंधाऱ्यात संतोष चव्हाण हा कर्मचारी बुडाला.  अलिबागमधील चौल येथील रामेश्वर तलावात पोहण्यासाठी उतरलेला मीत कोळवणकर हा पर्यटक बुडाला. कर्जतच्या पेब येथील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेला कल्याण-मलंगगड येथील अब्दुल नावाचा पर्यटक खोल दरीत कोसळला.जव्हार येथील प्रसिद्ध दाभोसा धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या जागृती होगले या महिला बाईक रायडरचा डहाणूजवळ अपघाती मृत्यू झाला.

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

पुढील लेख
Show comments