Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मित्राच्या आत्महत्येचा बदला म्हणून केला अपूर्वाचा खून

Webdunia
गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (11:24 IST)
कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अपूर्वाच्या प्रियकराच्या मित्रानेच तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अमर शिंदे या मारेकर्‍यास पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले. 
 
लातूर येथील अपूर्वा यादव (वय 19) या तरुणीचा तिच्याच घरात घुसून भर दिवसा खून करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून विशालनगर भागातच राहणारा अपूर्वाचा नववीपासूनचा वर्गमित्र अमर शिंदे (वय 19) यास संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याने अपूर्वाचा खून केल्याची कबुली दिली आहे. 23 जुलै 2018 रोजी अपूर्वाचा प्रियकर सार्थक बाळासाहेब जाधव (वय 19, रा. गोरेवाडी, ता. उस्मानाबाद) याने आत्महत्या केली होती. अपूर्वा दूर राहत असल्याचा विरह सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगणत येत होते. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अपूर्वा यादव हिच्यावर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मित्राच्याआत्महत्येचा बदला घेणसाठी अपूर्वाचा खून केलची कबुली शिंदे याने अटकेनंतर दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटातील रुग्णाचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाला स्थगित केलं

मी ऑटो चालवायचो... अडीच वर्षांपूर्वी मी मर्सिडीजला ओव्हरटेक केले, शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मध्ये कोटींचा घोटाळा? काँग्रेसचा मोदी सरकारवर मोठा आरोप!

पुढील लेख
Show comments