Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुक, 16 उमेदवार रिंगणात

Webdunia
सोमवार, 16 जानेवारी 2023 (21:11 IST)
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.
 
अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणात १६ उमेदवार आहेत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना हायव्होल्टेज ड्रामा चर्चेचा ठरला. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत अधिकृतपणे नसल्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष कोणाला पाठींबा देतो यावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात सामना होणार असल्याचे तूर्त तरी चित्र आहे. पाटील यांना ठाकरे गटाने पाठींबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा पाटील यांना पाठिंबा लाभला आहे. तर, तांबे यांना भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
 
रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर,धुळे अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो असहाक,मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील,धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे,नाशिक,अपक्ष, ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष, ॲड.सुभाष राजाराम जंगले,श्रीरामपुर, अपक्ष, सत्यजित सुधीर तांबे,संगमनेर, अपक्ष, नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील,धुळे अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष, संजय एकनाथ माळी,जळगाव,अपक्ष असे एकूण 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

Russia Ukraine War: रशियावर 9/11 सारखा प्राणघातक हल्ला

जर्मनीच्या ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसली, 2 ठार, 50 जखमी

दोन जणांनी घराची रेकी केली या दाव्याबद्दल संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला

बीड येथील सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य

LIVE: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

पुढील लेख
Show comments