Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nashik : नाशिकच्या जवानाला श्रीनगर येथे वीरमरण

Webdunia
रविवार, 10 सप्टेंबर 2023 (12:30 IST)
नाशिक : जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील जवानास वीरमरण आले आहे. चांदवड तालुक्यातील हरनूल येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीनगरला कार्यरत असताना कुस्तीचा सराव सुरु असताना दुर्दैवी निधन झाले आहे. विक्की अरूण चव्हाण (25) असे मृत जवानाचे नाव आहे. जवान विक्की अरूण चव्हाण श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. ते स्वतः कुस्तीपटू असल्याने अनेक स्पर्धांच्या निमित्ताने सराव करत असायचे. सायंकाळी कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. 
 
विक्की चव्हाण  बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात दाखल व्हायचंय, असा चंग बांधून ते भारतीय सैन्यात दाखल झाले. गेल्या साडे चार वर्षांपासून ते भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. पहिल्यापासून कुस्तीची आवड असल्याने ते भारतीय सैन्य दलाकडून देखील कुस्ती खेळत असत. चव्हाण यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत  निवड झाली होती. त्यामुळे ते रोजच कुस्तीचा सराव करत असत. पुढील महिनाभरात ही स्पर्धा होणार होती. त्यामुळे चव्हाण यांची जोरदार तयारी सुरु होती.

नेहमीप्रमाणे कुस्तीचा सराव सुरु असताना अपघात झाला यात चव्हाण यांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेमुळे चांदवड तालुक्यात हरनूल गावात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव रविवारी 10 सप्टेंबर रोजी दिल्लीहून मुंबईला पोहोचणार असून ओझर विमानतळ आणले जाणार असून सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
 Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

आमदार अनुप अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली

माझे बुद्धिबळ खेळण्याचे कारण पैसे नाही, असे गुकेशने जिंकल्यावर सांगितले

LIVE: उद्धव व आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

रणजित मोहिते पाटील यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली

साईबाबा मंदिर या दिवशी दर्शनासाठी 3 तास बंद राहणार

पुढील लेख
Show comments