नाशिक मित्र शिवीगाळ करीत असल्याचा मनात राग धरुन मित्राने डोक्यात दगड घालून खुन केल्याची घटना वणी – पिंपळगाव रस्त्यावरील औताळे गावाच्या शिवारातील वाघेरा डोंगरावर घडली. बेपत्ता झालेल्या मुलाचा पोलिस शोध घेत असतांना तीन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली. मित्रानेच या खूनाची कबुली दिली.
सोळा वर्षाचा प्रेम दौलत गांगुर्डे हा ८ जून रोजी हा घरातून बेपत्ता होता. याबाबत पोलिस व नातेवाईक बेपत्ता प्रेमचा शोध घेत असतांना ११ जुन रोजी सकाळी ११ वा. सुमारास श्रावन रमेश सकट (१८) याने पोलीस स्टेशनला येऊन कळविले की, माझा मित्र प्रेम दौलत गांगुर्डे हा व मी ता. ८ जुन रोजी दुपारी १२ वा. औताळे गावचे शिवारात वाघेरा डोंगरावर फिरण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मित्र प्रेम गांगुर्डे याने नशा केलेली होती. व तो सेल्फी काढण्याच्या नादात वाघेरा डोंगावरुन पाय घसरुन खाली पडला. त्यावेळेस मी घाबरलो होतो. या सर्व घटनेचा पोलिसांनी तपास करुन या खूनचा उलगडा केला.