Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये

Webdunia
राज्य शासनाने राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट याकरिता (नॉन क्रिमिलेअर) उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
 
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारने २४ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार कुटुंबाची मर्यादा ४.५० लाख वरून ६ लाख केलेली होती. केंद्र शासनाने १३ सप्टेंबर २०१७ रोजीच्या आदेशान्वये ही उत्पन्नाची मयार्दा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये केली आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाने ही मर्यादा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.
 
राज्य शासनाने राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधीसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आरक्षण अधिनियम, २००१ (२००४चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ८) अन्वये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे लागू करण्यात आलेले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

राजधानी दिल्लीत 4 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

पाच वर्षांपूर्वी महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी कोर्टाचा निर्णय, सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा

नाशिकमध्ये भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 2 ठार, 18 जखमी

विधानसभा निवडणुकीबाबत संजय राऊत यांचा दावा, MVA 160 हून अधिक जागा जिंकून स्थिर सरकार स्थापन करेल

Cold Moon 2024: कधी आणि कुठे दिसेल कोल्ड मून? जाणून घ्या या खगोलीय घटनेचे महत्त्व काय आहे?

पुढील लेख
Show comments