Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वायव्य भारत, उत्तरेत थंडीची लाट नाशिक येथे सर्वांत कमी तापमान नोंदविण्यात आले

Webdunia
मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (15:12 IST)
पुणे:वायव्य तसेच उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट पसरली असून, यामुळे महाराष्ट्र देखील गारठला आहे. राज्यात सोमवारी नाशिक येथे सर्वांत कमी 10.2 अंश सेल्सिअसइतके तापमान नोंदविण्यात आले.
राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीच्या भागात तीव्र थंडीची लाट पसरली आहे. या भागातील किमान तापमान खालावले आहे. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरच्या भागातही उणे तापमान नोंदविण्यात आले आहे. थंडीमुळे दल सरोवर गोठले आहे. या भागात हिमवर्षावाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. थंडीमुळे या भागात मोठय़ा प्रमाणात धुके पसरले आहे. यामुळे दळणवळणावरही परिणाम झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा तसेच धुक्याचा परिणाम जाणवणार आहे.
 
पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच राजस्थानच्या भागात तीव्र थंडीची लाट आहे. पश्चिम राजस्थानच्या भागातील चुरू येथे सोमवारी सर्वांत कमी 0 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. याशिवाय या राज्यात अनेक शहरांत एक अंकी किमान तापमान राहिले आहे. या भागात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
महाराष्ट्र गारठला.
 
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांत वाढ झाल्याने राज्यातील किमान तापमानही घटले आहे. निफाड येथे 7 अंश सेल्सिअस, तर नाशकात 10.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नेंदविण्यात आले. पुढील चार दिवस राज्यात कोरडे राहणार असल्याने थंडी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील विविध शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे : कुलाबा 19.2, सांताक्रूझ 16, रत्नागिरी 17.6, डहाणू 15.2, पुणे 12.1, लोहगाव 14.5, जळगाव 13.5, कोल्हापूर 17.7, महाबळेश्वर 14, नाशिक 10.2, सांगली 15.6, सातारा 12.9, सोलापूर 19.4, औरंगाबाद 11, परभणी 16.4, नांदेड 17.2, अकोला 17.4, अमरावती 16, बुलढाणा 16.8, ब्रह्मपुरी 15.5, चंद्रपूर 17.4, गोंदिया 15.2, नागपूर 15.3, वर्धा 16.3, यवतमाळ 16.5, गोवा 20.2
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

शरद पवार नागपुरात म्हणाले, महाराष्ट्रातील जनता सरकारला कंटाळली

शरद आणि अजित पवार एकत्र येणार का? काका विरुद्ध पुतण्या सामना, सुप्रिया सुळेंनी काय म्हटले जाणून घ्या

महाराष्ट्र सायबर पोलिसांची ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाइट BookMyShow ला नोटीस, काय आहे संपूर्ण प्रकरण

देवेंद्र फडणवीसांचे कुत्रे भुंकतात, सदाभाऊ शरद पवारांवर काय म्हणाले, संजय राऊत भडकले

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर मोठे वक्तव्य, संविधानाबाबत मोठी गोष्ट बोलले

पुढील लेख
Show comments