Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशा धमक्यांना घाबरत नाही, समाजासाठी मेलो तर आनंदचं आहे : छगन भुजबळ

chagan bhujbal
Webdunia
शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (20:35 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीवर अशा धमक्यांना मी घाबरत नाही, समाजासाठी मेलो तर आनंदचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.
 
भुजबळ म्हणाले की, मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाहीतर अनेकवेळा येत आहेत. जीवंत राहणार नाही, तुझी वाट लावू आणि शिव्या देत आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाहीत. पोलिसांकडे तक्रार केली आहे पोलीस काय ते बघतील असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
 
शिवसेनेच्या जन्म झाला तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठे केले असे सांगून शिव्या देतात, मला मोठ केलं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी... मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केलंय. माझं देखील काहीतरी योगदान आहे म्हणूनच मला संधी दिली असेल असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
 
पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच असल्याचे देखील बोलून दाखवले. मी एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही मी ओबीसी साठी काम करत आहे
 
जानकर यांनी मला समर्थन दिले मी त्यांचा आभारी आहे. सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचे काम आहे. राज्यात ओबीसी ५४ टक्के पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळे आणि टिकणारे आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचे मी काय खाल्ले हे त्यांनी सांगावे आणि आता मनोज जरांगे पाटील कुणाचे खातोय हे त्यांनी सांगावे असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

Disha Salian case: आदित्य ठाकरेंविरुद्ध एफआयआर दाखल होणार! सतीश सालियन मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचले

नागपूर : तुरुंगात कैद्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ, कुटुंबीयांनी तुरुंग प्रशासनावर केला आरोप

LIVE: संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली पत्रकार कोरटकरांना न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

शिवसेना-भाजप युती तुटू नये अशी फडणवीस यांची होती इच्छा...संजय राऊत यांचा खळबळजनक खुलासा

पुढील लेख
Show comments