Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना तडीपारीची नोटीस

Webdunia
गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (09:16 IST)
सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे मग तो पासपोर्ट घोटाळा, असो अथवा ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना काल मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे. नांदगावकर यांनी त्यासाठी कायदा हातात घेतला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नांदगावकरांनी पासपोर्ट घोटाळ्यामुळे अनेकांची झालेली फसवणूक उघड केली होती. नांदगावकर यांची तडीपारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या कारवाईला मनसेने प्रखर विरोध केला आहे.नांदगावकर फेसबुक लाईव्ह वरून नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न जनते समोर आणत होते नांदगावकर यांनी या नोटिसीला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी माझी कोणाला भीती वाटत आहे? माझी भीती सर्वसामान्य नागरिकांना वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुंबई पोलीस कामाला लागले आहेत. मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माझा, त्यामुळे मला कुठे तडीपारकरणार ? असा हि सवाल त्यांनी विचारला आहे. मी कुठे चुकलो हे जनतेनेच सांगावे, पण यापुढे देखील आपण अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतच राहणार असल्याचे नांदगावकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत  म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments