Marathi Biodata Maker

बस रायगडमध्ये बस दरीत कोसळली, 13-14 जण मृत्यूमुखी पडल्याची भीती

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2023 (09:35 IST)
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागच्या घाटामध्ये खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातात 13-14 लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती असल्याचं बचाव पथकातील कर्मचाऱ्याने पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते.   या घटनेत 20 ते 25 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या बस मध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील कार्यकर्ते होते. हे सर्व पुण्यात शुक्रवारी झालेला कार्यक्रम संपवून परत जात असताना ही घटना घडली आहे. ही बस तब्बल 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघातग्रस्ताच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्सनाही मदतीसाठी बोलावण्यात आलं आहे.
 
या खाजगी बसमध्ये बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील लोक होते. ते पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरगावला परत चालले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

यवतमाळ: कत्तलीसाठी तेलंगणात नेण्यात येत असलेल्या जनावरांची सुटका; तीन तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल

इंधन वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी सायकल चालवण्याचा अवलंब केला

LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

Veer Savarkar Jayanti 2026 Messages in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

पुढील लेख
Show comments