Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला; मोठे बंधू पुन्हा सक्रीय

Webdunia
बुधवार, 12 जुलै 2023 (07:36 IST)
On the visit of elder nephew Sharad Pawar Big Brother is active again राजकारण रंगले असताना पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पहिल्या पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार ज्या भावाच्या घरी थांबले होते, त्या भावाचा मुलगा आज शरद पवारांच्या भेटीला आला होता. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
 
अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांनी मुंबईत वाय बी सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच अजित पवार यांना श्रीनिवास पवार यांनी निरोप धाडत घरी बोलवून घेतले. यामुळे शरद पवारांविरोधात बंडाची तलवार उपसणारे अजित पवार पुन्हा माघारी येतात की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
 
अजित पवारांच्या बंडामुळे पवार कुटुंबावर याचा परिणाम दिसू लागला आहे. अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावर आघात करत त्यांच्या वेळोवेळच्या वागण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पवार कुटुंबातील दरी वाढू लागली आहे. अशातच आता अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार सक्रीय झाले आहेत. अर्थातच पवार कुटुंबातूनच या हालचाली सुरु झाल्या आहेत.
 
पहिल्या शपथविधीवेळी अजित पवारांना पुन्हा आणण्यात श्रीनिवास पवारच महत्वाचा दुवा ठरले होते. अजित पवार कुठे गेले असा शोध राज्यभरात सुरु होता, तेव्हा अजित पवार हे मोठ्या भावाच्याच घरी होते. यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी संपर्कात राहत सर्व सुत्रे फिरविली होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. अजित पवारांनी काकांविरोधात टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खूपच ताणले जाण्यापेक्षा ते मिटविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

उदय सामंत पुन्हा रत्नागिरीतून विजयी होणार की उद्धव सेना जाणून घ्या समीकरण

LIVE: धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

भाजपने जतमधून गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवले

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

महाराष्ट्रात शरद पवार राहुल गांधी,यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

पुढील लेख
Show comments