एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. निवृत्त सनदी अधिकारी के.पी.बक्षी यांची एकसदस्यीय चौकशी समिती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. के.पी.बक्षी हे राज्याचे माजी अपर मुख्य सचिव आहेत. ही एक सदस्यीय समिती गेल्या 15 वर्षांतील याबाबात घेण्यात आलेले निर्णय तपासणार आहे. या समितीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर मौजे गोंदेदुमाला, वाडिवरे येथील एमआयडीसी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.