Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकतर्फी प्रेमातून युवकाचा विवाहितेला त्रास, कंटाळून विवाहितेने पेटवून घेतले

Webdunia
बुधवार, 29 डिसेंबर 2021 (08:10 IST)
तु मला आवडतेस व मी तुला पसंत करतो. तु तुझ्या नवऱ्याला सोड चिठ्ठी दे, नाही दिली तर मी तुला पळवुन घेवुन जाईन. अशा प्रकारच्या युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. विवाहिता जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहेशितल स्वामी चव्हाण (वय 26 रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत विवाहितेचे
नाव आहे. युवक अभिमन्यू शिवराम भोसले (वय अंदाजे 23 रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शितल ही मूळची गुंडेगाव येथील असून घोसपुरी हे तिचे सासर आहे. घटना घडली त्यावेळी शितल माहेरी वडिलाकडे आलेली होती. अभिमन्यू हा शितलला म्हणाला, तु मला आवडतेस व मी तुला पसंत करतो.
तु तुझ्या नवऱ्याला सोड चिठ्ठी दे, नाही दिली तर मी तुला पळवुन घेवुन जाईन, अशी धमकी दिली.शितल ने अभिमन्यूला समजावून सांगितले; पण अभिमन्यू तिच्या प्रेमात वेडा झाला होता, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अभिमन्यूचा
त्रास असाह्य झाल्यानं शितल ने पेटून घेतले. यामध्ये शितल जास्त भाजली होती. शितलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिला त्रास देणारा युवक अभिमन्यू शिवराम भोसले
(वय अंदाजे 23 रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पसार झाला आहे.पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी गेले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

संबंधित माहिती

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

PM Modi In Mumbai : स्वप्नांच्या शहरात मी 2047 चे स्वप्न घेऊन आलो आहे- पंतप्रधान मोदी

एलोर्डा चषक बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत निखत जरीनसह चार बॉक्सर्स

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

पुढील लेख
Show comments