Dharma Sangrah

पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात, गर्डर लाँचिंगसाठी मेगाब्लॉक

Webdunia
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (17:13 IST)
येत्या महिन्याभरात मुंबईतील पत्री पुलाचे  काम पूर्ण करून नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी आज आणि उद्या मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या गर्डर लाँचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे घटनास्थळी आले आहेत.
 
गेल्या 2 वर्षांपासून पत्रीपुलाचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला आहे. लोकांनी दाखवलेल्या या संयमाचे कौतुक करत अनेक अडचणींवर मात करून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आणखी महिन्याभरात हा पूल नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान हे गर्डर लाँचिंग पाहण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील येणार असल्याचे खासदार श्रीकात शिंदे यांनी सांगितले आहे.
 
पत्रीपुलावर ७६ मीटर लांबीचा गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी मध्यरेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी व रविवारी सकाळी ९.५० पासून दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत डोंबिवली ते कल्याण दरम्यानची लोकल वाहतूक रद्द करण्यात आली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

आर. प्रज्ञानंद बुद्धिबळ विश्वचषकातून बाहेर, अर्जुन आणि हरिकृष्ण प्री-क्वार्टरफायनलमध्ये पोहोचले

LIVE: शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हाच्या वादाचा निर्णय आता पुढील वर्षी होईल

आयपीएल २०२६ चा ऑक्शन जाहीर, या दिवशी परदेशी भूमीवर खेळाडूंवर बोली लावली जाणार

Pune Navale Bridge Accident मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली

गडचिरोलीत एसीबीची मोठी कारवाई; २ क्लासवन अधिकाऱ्यांसह ७ जणांना अटक

पुढील लेख
Show comments