Festival Posters

प्लास्टिक चलनी नोटांचे काम नाशिकला मिळावे

Webdunia
बुधवार, 14 डिसेंबर 2016 (17:12 IST)
काही दिवसांपूर्वी  केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी देशात प्लास्टिक चलनी नोटा व्यवहारात आणण्याचे जाहीर केले आहे. या नोटा आयात न करता, नाशिकरोड प्रेसला हे काम मिळावे, अशी मागणी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे यांनी केली आहे.
 
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन् २०१४ साली प्लॅस्टिक नोटा बनविण्याचा व या नोटा बाहेरच्या देशातून मागविण्याचा प्रश्न चर्चेत आला होता. मजदूर संघाने प्लॅस्टिक नोट आयातीला तेव्हाच आक्षेप घेतला होता. मजदूर संघाच्या नेत्यांनी रिझर्व बँकेच्या गर्व्हनरला भेटून प्लॅस्टिक नोटांचे काम नाशिकरोड प्रेसला मिळावे, अशी मागणी केली होती. प्लॅस्टिक नोटा छापण्याचे तंत्रज्ञान नाशिकरोड प्रेसमध्ये आहे. प्रेस कामगारही कुशल आणि मेहनती आहेत. फक्त मशिनरी अपग्रेडेशन करण्याची गरज आहे. ते झाल्यास प्लॅस्टिक नोटा येथे छापता येतील,असा दावाही त्यांनी केला आहे.प्लॅस्टिक नोटा छापण्याचा निर्णय होईल तेव्हा आमचे कामगार या नोटा छापून देण्यास सक्षम राहतील, असा विश्वास प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी व्यक्त केला.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Cockroach Janta Party हा नवीन पक्ष अचानक कसा उदयास आला? अवघ्या ३ दिवसांत २० लाख सदस्य जोडले गेले!

धक्कादायक : आम्हाला आई-वडील नाही लिहलेली चिट्ठी देत पोटच्या दोन लहान मुलांना बस मध्ये सोडून जन्मदात्या आईने काढला प्रियकरासोबत पळ; बीड मधील घटना

भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरांचे नूतनीकरण केले जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

२४ तासांत मराठी घोषणा सुरू करा; राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने विमान कंपन्यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला

LIVE: मुंबईतील हॉटेल्सना 'चीज अॅनालॉग' लेबल अनिवार्य

पुढील लेख
Show comments