rashifal-2026

Pradeep Sharma granted bail प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (07:17 IST)
Pradeep Sharma granted bail अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एस बोप्पना यांच्या अध्यक्षतेखालील बँचने हा जामीन मंजूर केला.
 
शर्मा यांनी पत्नीची प्रकृती ठीक नसून, तातडीची शस्त्रक्रिया करायची आहे, त्यासाठी जामीन मिळावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी उच्च न्यायालयाने शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पत्नीच्या प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना दिलासा देत 3 आठवडय़ांसाठी जामीन मंजूर केला.
 
प्रदीप शर्मा हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घरासमोर कारमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी तसेच ठाण्यातील कार शॉप मालक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी शर्मा अटकेत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील नमोकार तीर्थ देशातील प्रमुख जैन केंद्र बनणार, फडणवीस सरकारने ३६ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिली

LIVE: माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली

नीरज चोप्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, पत्नी हिमानी मोर देखील उपस्थित होती

लेखक-कवी विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

मराठवाड्यात नवीन रेल्वे मार्गाची मागणी, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

पुढील लेख
Show comments