Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात गर्भवती पत्नीला जिवंत जाळले

Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (18:04 IST)
ठाण्यातील एका तरुणाने आपल्या गर्भवती पत्नीला जिवंत पेटवलं  आहे. या भयावह घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत  झाला आहे. पीडितेवर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या  आहेत. या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस करत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
अनिल चौरासिया असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपी पतीचं नाव असून तो कळवा परिसरातील रहिवासी आहे. आरोपी अनिल आणि त्याची जखमी पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी अनिल याने अन्य एका तरुणीसोबत विवाह केल्याचा संशय जखमी पत्नीला होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजी दोघांत पुन्हा एकदा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं आहे. पीडित महिला सहा महिन्यांची गर्भवती असूनही आरोपीने तिच्यासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपी पतीने रॉकेल टाकून पेटवल्याने पीडित महिला गंभीररित्या भाजली होती. या धक्कादायक घटनेनंतर शेजाऱ्यांनी जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. 
 
मुंबईतील जे जे रुग्णालयात जखमी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, पीडित महिलेचं संपूर्ण शरीर भाजल्यामुळे तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 1 नोव्हेंबर रोजी कळवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

एआय वापरा पण त्याचे गुलाम बनू नका - मुकेश अंबानी

गुइलेन-बॅरे सिंड्रोम, गूढ आजाराने पश्चिम बंगालमध्ये किशोरचा मृत्यू

LIVE: स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे वाढली

ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्यामुळे बाबा रामदेव संतापले! दिली ही प्रतिक्रिया

ठाण्यात 81 शाळा बेकायदेशीर, शाळा बंद न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा

पुढील लेख
Show comments