Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:31 IST)
सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे 'विकून टाक'. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित 'विकून टाक' हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे 'चांदवा' हे  प्रमोशनल गाणे डॉ. दिव्या बिजूर या अंध मुलीने गायले असून त्या पेशाने फिजिओथेरपिस्ट आहेत.  त्यांच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल डॉ.दिव्या सांगतात,'' 'विकून टाक' या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी यांनी मला एका समारंभात गाणे गाताना ऐकले आणि त्यांना ते गाणे खूप आवडले. तेव्हा राजेंद्र सरांनी उत्तुंगजींकडे माझी शिफारस केली. त्यानंतर उत्तुंगजींनी माझा आधीचा एक प्रदर्शित झालेला अल्बम ऐकला आणि या चित्रपटामध्ये गाणे गाण्याची संधी दिली.  दुसरी गोष्ट म्हणजे ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ सारख्या एवढ्या मोठ्या प्रॉडक्शन’  हाउसमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे उत्तुंग ठाकूरजींची मी खूप आभारी आहे. तसेच संगीतकार अमितराज यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न ‘विकून टाक’ या चित्रपटामुळे शक्य झाले आहे. हा चित्रपट अवयवदानासारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. मला या गाण्याच्या रूपाने एक चांगली संधी मिळाली जेणेकरून मी अवयवदानाबद्दल जागृती पसरवू शकते.''
 
'अ विवा इनएन प्रॉडक्शन' आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments