Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे-सातारा महामार्ग टोलमुक्त असल्याचं जाहीर, मात्र टोलवसूली सुरूच

Webdunia
सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (21:44 IST)
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-सातारा महामार्ग टोलमुक्त असल्याचं जाहीर केलं. मात्र, त्यानंतर २ दिवसाच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या उलट भूमिका घेत टोलवसूली सुरूच राहणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे गडकरी विरुद्ध एनएचएआय अशी परिस्थिती तयार झालीय. रिलायन्स इंफ्रानकडून टोल वसुलीचं काम आपल्याकडे घेतलं जाणार असल्याचंही एनएचएआयने म्हटलं.
 
एनएचएआयचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस म्हणाले, “एनएचएआय पुढील काही काळासाठी पुणे-सातारा महामार्गावरील टोल वसुलीचं काम आपल्याकडे घेईल. या काळात देखभाल दुरुस्तीशी संबंधित काम एनएचएआय करेल. या कामासाठी आम्ही 50 कोटी रुपये खर्च करण्याचं नियोजन करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स सोबतच्या करारानुसार महामार्ग रिलायन्सकडे सुपुर्द केला जाईल.”
 
एनएचएआयने महामार्गाचं काम आपल्याकडे घेतल्यानंतर टोलमध्ये सूट देण्याचा किंवा टोलच्या दरात सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जिंकूनही काँग्रेसचा पराभव

आमदारांच्या घरांची तोडफोड करणाऱ्या आणखी सात जणांवर पोलिसांनी केली कडक कारवाई

Sambhal Jama Masjid : संभल मध्ये दगडफेक आणि जाळपोळ, 20 हून अधिक पोलीस जखमी, दोघांचा मृत्यू

नोकरी देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक, आरोपीला अटक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात AIMIM चे इम्तियाज जलील, नसरुद्दीन सिद्दीकी यांचा पराभव

पुढील लेख
Show comments