Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनमाडमधील इंदोर-पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा खचला

Webdunia
बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (20:45 IST)
मनमाड : सौ.नैवेद्या बिदरी : शहरातून जाणाऱ्या इंदौर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा पहाटे पाच वाजेच्या सुमारास खचल्याने दुर्घटना घडली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची चर्चा जरी असली तरी मोठ्या प्रमाणात पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्याने पडलेल्या ढगाराखाली काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
 
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वेचा ओवर ब्रिज हा ब्रिटिश कालीन असून शहराचा दोन भाग जोडणारा हा ओव्हर ब्रिज आहे.मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या ओवर ब्रिजचा येवल्या बाजूकडील कठडा मोठ्या प्रमाणात खचला. या ओव्हर ब्रिजच्या पूर्व बाजूला दगड मातीचे ढिगार मोठ्या प्रमाणात कोसळा आहे.
 
दरम्यान इंदूर- पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या असून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदौर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
 
ब्रिटिश कालीन ओव्हर ब्रिज असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झालेल्या ओव्हर ब्रिजची दुरुस्ती करण्याची मागणी आणि शहराला बायपासची उभारणीची मागणी वेळोवेळी शहरातील विविध सामाजिक संघटना आणि अभियंता संघटने तर्फे करण्यात आली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले, मोठा हल्ला होण्याची भीती

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

पुढील लेख
Show comments