Marathi Biodata Maker

महाराष्ट्र, गोवा तसेच दक्षिणेत पाऊस घटणार

Webdunia
शनिवार, 29 जुलै 2023 (07:30 IST)
महाराष्ट्र, गोवा, तसेच दक्षिणेकडील बऱ्याच राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली, तर शनिवारनंतर पूर्वेकडील राज्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
 
बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे गेले दोन आठवडे राज्याला पावसाने झोडपले आहे. गुरुवारीही विदर्भ, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत रेड तसेच ऑरेंज अलर्ट होता. या पावसाने जुलै महिन्याचीही सरासरी ओलांडली असून, अनेक भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, येत्या 24 तासांनंतर या पावसाचा जोर कमी होणार असून, शनिवारपासून अनेक भागांत तुरळक पावसाचा यलो अलर्ट आहे.
 
सध्या बंगालच्या उपसागरात ओरिसा व आंध्र किनारपट्टीजवळ असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. पंजाब व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने महाराष्ट्रातील पाऊसही ओसरणार आहे.
 
शुक्रवारी ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
 
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, गोंदिया भंडारा
 
शनिवार ऑरेंज अलर्ट
 
पुणे, रायगड
 
रविवार ऑरेंज अलर्ट
 
कुठेच नाही
 
देशभरात सरासरीच्या अधिक पाऊस
दरम्यान, दमदार पावसामुळे देशभरातील पावसाची तूट भरुन निघाली असून, सरासरीच्या 5 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये वगळता देशातील इतर राज्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.
 
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात आबादानी
जुलै महिन्याच्या पावसाने महिना संपायच्या आधीच सरासरी ओलांडली असून, महाराष्ट्रात अतिरिक्त सरासरीच्या 56 टक्के अधिक, गोव्यात अतिवृष्टी सरासरीच्या 92 टक्के अधिक, तसेच कर्नाटकात अतिवृष्टी होत सरासरीज्च्या 63 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील घोडबंदर रोड प्रकल्प 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, पुणे-लोणावळा लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी गिलला खेळण्याची मिळाली परवानगी

पुढील लेख
Show comments