suvichar

राज्यात पावसाचा जोर कायम

Webdunia
शुक्रवार, 18 जून 2021 (16:04 IST)
राज्यात गेल्या ३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर, सातारा,सांगली,रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील सर्व नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. कोल्हापूरातील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत गेल्या १२ तासात ३ फुटांनी वाढ झालीय. कोल्हापूर जिल्ह्यातील ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी २३ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून सुमारे २१०० क्युसेक पाणाच्या विसर्ग केला जाणार आहे. कोयना धरणात सध्या २५ हजारांपेक्षा जास्त क्युसेस पाण्याची आवक होत आहे. तर कोकणातील अनेक गावात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने अनेक नद्यांवरिल पूल पाण्याखाली गेले आहेत. जगबुडी,वशिष्ठी,काजळी,कोदवली यांसारख्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आठ नद्या सध्या इशारा पातळीवर आहेत. 
 
राज्यातील विविध जिल्ह्यात पुढील ४८ तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. दापोली, मंडणगड,लांजा,राजापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकण आणि पालघर जिल्ह्याला सध्या रेट अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरातही पावसाचा जोर कायम. कोल्हापूरातील पंचगंगा नदीच धोक्याची पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे NDRFची टीम तैनात होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोल्हापूरात पुन्हा पूर सदृष्यजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' सुरू, महसूल आणि जमिनीचे प्रश्न क्षणार्धात सोडवता येतील

Women's Asia Cup Rising Stars भारताने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र सरकारच्या मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी

LIVE: मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

१५ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून ५ दिवस जंगलात बंदी बनवून केला सामूहिक लैंगिक अत्याचार; अहिल्यानगर मधील घटना

पुढील लेख
Show comments