Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रविवारच्या सभेसाठी राज ठाकरे औरंगाबादला पोहोचले, 3 मे रोजी करणार महाआरती

Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (14:31 IST)
मनसे सुप्रीमो राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबादेत सभा होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहल्यानंतर ते 400 वाहनांसह औरंगाबादकडे निघाले. राज ठाकरेंना 16 अटींसह औरंगाबादेत सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. संमेलनस्थळाची तयारीही पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे लाऊडस्पीकरच्या वादात राज ठाकरेंना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा पाठिंबा मिळाला आहे. ते 3 मे रोजी मनसेसोबत महाआरती करतील आणि लाऊडस्पीकरही वाजवतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही 5 मे रोजी अयोध्येला भेट देऊ शकतात. त्यापूर्वी ते लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ शकतात, असे मानले जात आहे.
 
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या तारखेपर्यंत एकतर मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाका नाहीतर हनुमान चालीसा मोठ्या आवाजात वाजवण्यात येईल, असे ठाकरे यांनी उद्धव सरकारला सांगितले आहे. निवेदनात राज ठाकरे म्हणाले होते की, हा सामाजिक प्रश्न आहे, धार्मिक नाही. मी राज्य सरकारला सांगू इच्छितो की आम्ही या प्रकरणात मागे हटणार नाही. जे काही करायचे ते करा.
 
त्याचवेळी महाराष्ट्रात नवनवीन राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंवर शिवसेनेने हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी बाळ ठाकरेंची काळजी करण्याची गरज नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी शिवसेनेचा विश्वासघात केल्याचेही संजय राऊत म्हणाले. ज्या राज ठाकरेंनी योगींचा अपमान केला होता, तेच राज ठाकरे आता भाजपला पसंत करू लागले आहेत.
 
याआधी शुक्रवारी शिवसेनेने कोणत्याही आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देऊ शकते असे म्हटले होते. भारतीय जनता पक्ष मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन) प्रमुख असदुद्दीन ओवेसीचा वापर करतो आणि आता शिवसेनेच्या हिंदुत्वावर हल्ला करण्यासाठी काही हिंदू ओवेसींना तयार करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Republic Day 2025 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2025

LIVE: आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दावोस दौऱ्यावर टोला

ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या महिला आणि पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कोणाचा होणार सामना जाणून घ्या

H-1B व्हिसाधारकांची मुले 21 वर्षांची झाल्यावर अमेरिका सोडावी लागेल, ट्रम्प यांचा धोरणाचा विरोध

दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला

पुढील लेख
Show comments