Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांची माहीममधील बांधकामाचा आधीचा आणि कारवाईनंतरचा फोटो ट्वीट करत प्रतिक्रिया

Webdunia
शनिवार, 25 मार्च 2023 (08:33 IST)
राज ठाकरे यांनी माहीममधील बांधकामाचा आधीचा आणि कारवाईनंतरचा फोटो ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. “धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची आणि सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात दाखवली होती. त्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. तत्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल, सांगली मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो”, असे ते म्हणाले.
<

सस्नेह जय महाराष्ट्र!

धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना… pic.twitter.com/84q0mshbuM

— Raj Thackeray (@RajThackeray) March 24, 2023 >
पुढे बोलताना त्यांनी नागरिकांनी दक्ष राहाण्याचे आवाहन केले. “आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमण राज्यभर सुरु आहेत. हे फक्त अतिक्रमण नव्हे, तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमण आहे. त्यावर वेळीच उपाययोजना झाली नाही, तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments