Dharma Sangrah

राज्यात बलात्कार पीडित महिलांना केवळ तीन लाख नुकसान भरपाई का ?

Webdunia
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (17:48 IST)
गोवा सरकार बलात्कार पीडित महिलांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देते, तर महाराष्ट्रात केवळ तीन लाख का ? बलात्कार पीडित महिलांना केवळ तीन लाख रुपये इतकी तुटपूंजी नुकसान भरपाई का दिली जाते? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी उपस्थित केला आहे. बोरीवलीतील एका बलात्कार पीडित मुलीने राज्य सरकारच्या विरोधात हायकोर्टात याचिका केली आहे. या मुलीवर बलात्कार झाला नसून हे संगनमताने ठेवलेल्या शरीरसंबंधांचं प्रकरण असल्याचं कारण देत, राज्य सरकारने तिला नुकसान भरपाई नाकारली. त्यामुळे या मुलीने संबंधित कलेक्टर विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातील पीडित मुलगी ही 14 वर्षांची असून अल्पवयीन आहे. त्यामुळे तिने दिलेली शरीरसंबंधांची संमती ग्राह्य कशी धरली जाईल? असा सवाल करत संबंधित कलेक्टरला पुढील सुनावणीला हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: भांडुपमध्ये बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू

सिंहस्थ कुंभमेळा 2027: महाराष्ट्र सरकारने 'पुरोहित-कनिष्ठ सहायक पुजारी' अभ्यासक्रम सुरू केला

आदित्य ठाकरे यांनी अरवलीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले

इंडोनेशियातील सुलावेसी प्रांतातील एका वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 वृद्धांचा मृत्यू

महापालिका निवडणुकीत राजकारण्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट न देण्याचा फडणवीसांचा निर्णय

पुढील लेख
Show comments