Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार यांना कोरोना झाला की नाही वाचा पूर्ण बातमी

Webdunia
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (17:08 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे अशी  माहीती समोर येत आहे. अजित पवार यांना सौम्य लक्षणं असून मुंबईमधील घरात ते क्वारंटाइन झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द केला होता. मात्र यावेळी कोणतंही कारण दिले नाही. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले असता अजित पवार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अजित पवार तीन दिवसांपुर्वी अतिवृष्टीच्या पाहणीसाठी सोलापुर दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागल्याने तातडीने कोरोना चाचणी केली . 
 
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत असं सांगितंल होतं. राष्ट्रवादीकडून ट्विट करत अजित पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज सकाळी उपलब्ध राहू शकणार नाहीत अशी माहिती देण्यात आली होती. अजित पवारांनी हे ट्विट रिट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार, २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी”. इंडियन एक्स्प्रेस नुसार - Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar has tested positive for Covid-19, highly placed sources told The Indian Express. He has mild symptoms and has been quarantined at his home in Mumbai.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

पुढील लेख
Show comments