rashifal-2026

काढला मित्राचा काटा! पार्टी केली, भांडले अन् तिसऱ्या मजल्यावरुन...

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2022 (08:25 IST)
जळगावात गोलानी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मुकेश रमेश राजपूत या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. मुकेशचा मृत्यू हा तपासात निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
लग्नाचं आमिष दाखवून केले अत्याचार; वर्ध्यात पोलीस निरीक्षकार गुन्हा दाखल
पोलिसांनी याप्रकरणी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे यासह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे. मृत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर काम करत होता सोमवारी काम आटोपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला होता. त्यानंतर मुकेशचे मित्र अमर उर्फ लखन बारोट व पराग उर्फ बबलू आरखे या दोघांनी मुकेशला पार्टी करायची सांगत गोलानी मार्केटमध्ये बोलावलं. त्यानंतर ते त्याला तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले.
 
मित्र इथे बसून दारू पीत असताना अमर व पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. या वादातून दोन्ही मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली. घटनेनंतर अमर उर्फ लखन व पराग उर्फ बबलू हे दोघे पोलीस स्टेशनला जाऊन मुकेश वरून पडल्याची बतावणी करत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत परिसरातील सीसीटीव्ही ची पाहणी केली असता मुकेशला वरून ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या दोघांना अटक केली असून त्यांचा सहकारी निखिल राजेश सोनवणे यास देखील पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments