Dharma Sangrah

नाशिक: मोठ्या परताव्याच्या आमिषाला भुलले, सेवानिवृत्त वृद्धाने नऊ लाख गमावले

Webdunia
मंगळवार, 9 जानेवारी 2024 (10:24 IST)
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त वृद्धास चार जणांनी नऊ लाख रुपयांना ऑनलाईन गंडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुनील दत्तात्रय बागूल (वय 67, रा. कृष्णा रेसिडेन्सी, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक) हे जळगाव येथे पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बागूल हे घरी असताना त्यांना पीयूष शर्मा, राघव शर्मा, विवेक जोशी व संजय कुमार नामक व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्याशी संपर्क साधला. बागूल हे गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत होते.
 
ही संधी साधून या चारही आरोपींनी संगनमत करून बागूल यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून बागूल यांना पीयूष शर्मा, राघव शर्मा, विवेक जोशी व संजय कुमार यांनी त्यांना पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार वरील आरोपींनी बागूल यांच्याकडून दि. 18 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत वेळोवेळी 8 लाख 75 हजार 494 रुपये ऑनलाईन, तसेच विविध बँक खात्यांवर जमा करण्यास सांगितले.
 
त्यानुसार त्यांनी ही रक्कम जमा केली; मात्र त्यांना जादा परतावा मिळाला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर बागूल यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. तेथे चार आरोपींविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments