Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपा नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला रोहित पवार यांचे ठोस प्रत्युत्तर

Webdunia
सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (17:24 IST)
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. यात ते लिहितात “धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजपा सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झालं. आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार, खून यासारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत,सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे.
 
अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात. आपलं महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभ राहणार सरकार आहे. मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा, अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठराविक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. बिहार निवडणूक जवळ येताच महाष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
 
“याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे, महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण,माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत.
 
त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत, अस दिसतंय. परंतु आपली जनता सुज्ञ आहे.
 
विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचं काम विरोधकांनी बंद करावं. महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments