rashifal-2026

गरम पाण्यामुळे चिमुकलीचा मृत्यू!

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2023 (10:05 IST)
Sambhaji Nagar Two year old dies  मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरात अंघोळीसाठी ठेवलेले पाणी गरम अंगावर पडल्याने  दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरात बहिणींसोबत खेळताना चिमुकलीच्या अंगावर गरम पाणी सांडले. ही घटना शुक्रवारी घडली होती.  यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.
 
शिद्रा हारून शेख असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. शिद्रा ही आई- वडील, आजी, आजोबासोबत कांदबरी दर्गा छावणी परिसरात राहत होती. दरम्यान, शुक्रवारी शिद्राच्या आईने पतीच्या अंघोळीसाठी गॅसवर पाणी ठेवले आणि बाथरूममध्ये गेली. त्यावेळी शिद्रा तीन बहिणींसोबत घरात खेळत होती. मात्र, शिद्राचा गरम पाण्याच्या बादलीला धक्का लागला. पाणी अंगावर सांडल्याने ती भाजली. त्यानंतर शिद्राला त्वरीत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
मात्र, उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मलकापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडाराच्या देवरी उड्डाणपुलावरील खड्ड्यांने घेतला आणखी एका तरुणाचा जीव

जशपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारची ट्रेलरशी धडक, पाच जणांचा मृत्यू

स्फोट झाला तेव्हा डान्स फ्लोअरवर 100लोक नाचत होते; गोवा नाईटक्लबचा व्हिडिओ समोर आला

दौंडमध्ये 430 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी

पुढील लेख
Show comments