Festival Posters

समीर वानखेडेंमागे चौकशी; NCBपाठोपाठ आता राज्य सरकारचीही समिती

Webdunia
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (21:25 IST)
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात २५ कोटी रुपयांच्या डील प्रकरणात राज्य सरकारतर्फे चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकरणी एनसीबीकडूनही यापूर्वी स्वतंत्र चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून दररोज वेगवेगळे आरोप होत असल्याने घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकार आणि एनसीबी अशा दुहेरी चौकशीच्या फेर्यात अडकले आहे.
 
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील करण्यात आली होती. यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते, असा धक्कादायक आरोप ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.
 
प्रभाकर साईल, अॅड. सुधा द्विवेदी, अॅड. कनिष्का जैन, नितीश देशमुख यांनी केलेल्या तक्रारींची दखल राज्य सरकारतर्फे घेण्यात आली. चौकशीसाठी चार पोलिस अधिकार्यांची नेमणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले, पोलिस निरीक्षक अजय सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पारकर, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवळी यांचा समावेश आहे.
 
आर्यन खान प्रकरणात अॅड. कनिष्ठ जयंत यांनीही तक्रार दिली आहे. १२ आणि १६ ऑक्टोबरला के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याची माहिती अॅड. जयंत यांनी माध्यमांना दिली. या सर्वांनी एकत्र येऊन कट रचून आर्यनचे अपहरण केले आणि कोट्यवधींची खंडणी शाहरूख खानच्या वकिलांकडून मागितली, अशी लेखी तक्रार त्यांनी दिली आहे. रमीर वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

भाजप आणि शिवसेना नगरसेवक त्यांचा नेता निवडण्यासाठी बैठक घेणार, अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

LIVE: महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली

महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा योजना जाहीर केली

संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हटले? ज्यावर पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments