Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊतांना परदेश प्रवासासाठी महिन्याला 2 लाख मिळायचे- ईडीचा दावा

Webdunia
गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (16:06 IST)
शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना पत्राचाळ आर्थिक गौरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
संजय राऊत आणि कुटुंबियांना परदेशात आणि देशांतर्गत प्रवासासाठी दर महिन्याला 2 लाख रुपये दिले जात होते असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. यासंदर्भात ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्र लागली आहेत.
 
ही कागदपत्र संजय राऊत यांच्यासमोर चौकशी दरम्यान ठेवण्यात आली. यात काही लोकांना रोख रक्कम दिल्याचं नमुद करण्यात आलंय. ही कागदपत्र राऊत यांच्याकडून जप्त करण्यात आली असून 1.70 कोटी रूपये रोख दिल्याचं समोर आलंय.
 
तसंच बॅंक अकाउंटची चौकशी केल्यानंतर काही अनोळखी व्यक्तींनी वर्षा राऊत यांना पैसे दिल्याचं दिसून येतंय. वर्षा राऊत यांच्या बँकेत 1.08 कोटी रुपये डिपॉझिट केल्याचंही दाखवलं आहे.
 
यासंदर्भात संजय राऊत यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत असंही ईडीने म्हटलंय.
 
रविवारी (30 जुलै) रात्री उशीरा संजय राऊत यांना तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयानं 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.
 
ईडीने गेल्या दोन दिवसांत या प्रकरणी दोन ठिकाणी छापेमारी केली. एएनआयच्या वृत्तानुसार, 'ईडीच्या हाती या प्रकरणातली महत्त्वाची कागदपत्र लागली आहेत. संजय राऊत यांनी अलिबाग येथील 10 प्लॉट्सच्या विक्रेत्यांना 3 कोटी रुपये रोख दिले.'
 
दरम्यान, ईडीने आजही काही जणांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.
 
संजय राऊत यांना 8 दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.
 
ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) अनेक नेत्यांकडून करण्यात आला आहे, तर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी 'कर नाही त्याला डर कशाला' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
ईडीनं रिमांड कॉपीमध्ये काय म्हटलं?
संजय राऊत यांनी प्रवीण राऊत, वाधवान यांच्यासोबत संगनमताने प्रकल्प पूर्ण न करता आर्थिक गैरव्यवहार करण्याचं षड्यंत्र रचलं.
 
2010 मध्ये वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्याकडून 55 लाख रुपयाचं असुरक्षित कर्ज घेतलं.
 
2011 मध्ये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या प्रवीण राऊत यांच्या कंपनीतील गुंतवणुकीसाठी मुद्दलाव्यतिरिक्त 37 लाख रूपये दिले गेले. त्यानंतर वर्षा राऊत यांना 14 लाख रूपये देण्यात आले.
 
संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांचा पत्राचाळ प्रकरणात सहभाग असल्याची माहिती नाही, असं जबाबात सांगितलं आहे. मात्र, 2012-13 पासून ते प्रवीण राऊतला ओळखतात असं ते सांगतात.
 
एक कोटी रुपयांची प्रॅापर्टी गैरमार्गाने कमावलेली नाही असा संजय राऊत यांनी ईडीला दिलेल्या जबाबात दावा केलाय.
 
अवनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी स्थापन करताना वर्षा राऊत शिक्षिका आणि माधुरी राऊत (प्रवीण राऊतांच्या पत्नी) गृहिणी होत्या.
 
पत्राचाळ प्रकल्पातून येणारा पैसा ट्रान्स्फर करण्यासाठी संजय राऊत यांनी कंपनी स्थापन केली.
 
अवनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत 5 हजार 625 रुपयांची गुंतवणूक केल्याबद्दल वर्षा राऊत यांना 13 लाख 94 हजार रूपये मिळाले.
 
या गोष्टी आणि पुरावे पाहता संजय राऊत PMLA मनी लाँडरिंग कायद्याचं कलम 3 नुसार दोषी आहेत. ते चौकशीत सहकार्य करत नाहीत.
 
संजय राऊतांच्या रिमांडवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ईडीच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला.
 
ईडीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद
प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, असा दावा ईडीच्या वकिलांनी केली आहे.
 
अलिबागची जमीन याच पैशातून खरेदी करण्यात आली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ प्रकरणात. थेट आर्थिक फायदा झालाय.
 
प्रविण राऊत फक्त नावाला होते. ते संजय राऊत यांच्यावतीनं सर्व व्यवहार करत होते.
 
मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले.
 
संजय राऊत यांनी काही पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.
 
रात्री 10.30 नंतर चौकशी करणार नाही
 
राऊतांच्या बचावात वकिलांचा युक्तिवाद
संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूनं प्रेरित आहे.
 
या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत. इतकी दिवस का नाही कारवाई केली कारण ही कारवाई राजकीय हेतूनं करायची होती.
 
संजय राऊत हार्ट रुग्ण आहेत. त्यांच्याशी उशीरा चौकशी करू नये.
 
राऊतांची चौकशी सुरू
असताना वकीलांना उपस्थित राहू द्या.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments