Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत यांचे ट्वीट, भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप

Webdunia
शनिवार, 18 मार्च 2023 (21:51 IST)
ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. कारण या फोटोमध्ये  एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.
 
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बार्शी येथे ही घटना घडडली आहे. भाजपाच्या गुंडांनी 5 मार्चला तिच्यावर हल्ला केला असून ती पारधी समाजाची आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका असं आवाहन यावेळी त्यांनी फडणवीसांना केलं आहे.
 
"देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? 5 मार्चला हल्ला झाला. आरोपी मोकाट आहेत," असं संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments