Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, भाजप नेते नारायण राणे यांचे खळबळजनक वक्तव्य

Webdunia
बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (17:16 IST)
narayan rane on chatrapati shivaji maharaj : छत्रपती शिवाजी महारांजानी सुरत लुटलं नव्हतं असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. त्यांच्या या विधानांनंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या.देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर भाजपचे नारायण राणे यांनी खळबळजनक वक्तव्य दिले आहे. 
 
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गुजरातमधील सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटले होते, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 
 
राणे म्हणाले की, मी इतिहासकार नाही पण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून जे काही वाचले, ऐकले आणि जाणून घेतले त्यानुसार शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती.
 
यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच काँग्रेसवर हल्लाबोल करत छत्रपतीं शिवाजी महाराजांनी कधीही सुरत लुटली नसल्याचे म्हटले होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपतीं शिवाजी महाराजांना चुकीच्या पद्धतीने दाखवले होते.

सुरत मध्ये छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. काँग्रेसने शिकवण दिली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आहे. फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर छत्रपतीं शिवाजीने सुरत लुटली हे काँग्रेसने मुद्दाम शिकवले. तर छत्रपतीं शिवाजीने स्वराज्यासाठी खजिना लुटला किंवा देशहितासाठी खजिनावर हल्ला केला.
 
तर  शिवसेना-यूबीटी नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सुरतमधील व्यापारी मंडळी ईस्ट इंडिया कंपनीला पैसे द्यायची. छत्रपती शिवाजींनी अशा व्यापाऱ्यांना लुटण्याचा निर्णय घेतला कारण ते ईस्ट इंडिया कंपनीला संरक्षण रक्कम देत होते. देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास वेगळा आहे.
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: महाकुंभ चेंगराचेंगरीत 100 हून अधिक मृत्यू झाल्याचा संजय राऊतांचा दावा

महाकुंभ चेंगराचेंगरीत 100 हून अधिक मृत्यू, संजय राऊत यांनी केला मोठा दावा

रशियाने रात्री युक्रेनवर 80 हून अधिक ड्रोन गोळीबार केला, चार नागरिक ठार, नऊ जखमी

IND vs ENG :चौथा T20 सामना, तो कधी आणि किती वाजता सुरू होईल हे जाणून घ्या

काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला, म्हणाले- संसदीय समित्या केवळ दिखावा बनल्या आहे

पुढील लेख
Show comments