अल्पसंख्यांक, दलित यांच्या मनात भय निर्माण होणं चांगलं नाही. राजकारण्यांपेक्षा मला या देशातल्या जनतेवर जास्त विश्वास आहे, ते काही अमंगल घडू देणार नाहीत. ‘गाय उपयुक्त पशु है, जब इसकी उपयुक्तता खतम हो तो किसानोंपर बोझ नही होना चाहिए.’ असं सावरकरच म्हणत होते. देशातल्या लोकांवर अशी जबरदस्ती चांगली नाही.’ असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन दिल्लीत झाले. ‘अपनी शर्तोंपर’ असं या पुस्तकाचं नाव आहे. त्यावेळी ते बोलत होते.