suvichar

कोणीही भेटलं म्हणून खुलासा करत बसू का? - शरद पवार

Webdunia
शुक्रवार, 15 मार्च 2024 (09:28 IST)
पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अर्थात तात्या मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. “अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद म्हटले की, पुणे लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे. परंतु मनसेमध्ये चार जणांचीही लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्यापैकी एकाला तिकीट द्यावे आणि निवडून आणावे. कारण मी आता परतीचे दोर कापले आहेत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
 
वसंत मोरे यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांना पत्रकार परिषदेत वसंत मोरेंबाबत प्रश्न करण्यात आला. यावर ते म्हणाले की, तुम्ही मला आता भेटलात त्याचा खुलासा करायचा असतो का? मला कोणीही भेटलं म्हणून खुलासा करत बसू का? असे प्रश्न उपस्थित करत राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच त्यांनी काय करावं याबाबतही चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

केंद्राने राघव चड्ढा यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा दिली

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत खरात यांच्या संपर्कात असलेल्या राजकारण्यांची यादी प्रसिद्ध केली

इन्फोसिस BPM पुणे येथे महिला कर्मचाऱ्यांच्या छळाचे आरोप; कंपनीने जारी केले निवेदन

LIVE: अजित पवारांच्या आठवणीने रोहित पवार भावूक; सुनेत्रा पवार यांच्यासाठी ९९% मतांची मागणी केली

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली

पुढील लेख
Show comments