Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार यांचं ‘त्या’ वक्तव्याबाबत अवघ्या पाच तासात यू-टर्न; म्हणाले, ‘मी असं बोललोच नाही’

Webdunia
शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (07:59 IST)
सातारा :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी अजित पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होते. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही.’ मात्र अवघ्या ५ तासात शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत यु-टर्न घेतला आहे.
 
अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी घुमजाव केलं आहे. "अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही," असं शरद पवार म्हणाले. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.
 
'सुप्रिया सहजपणे बोलत असतील तर राजकीय अर्थ काढू नये'
शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. बारामतीहून साताऱ्यात पोहोचल्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना शरद पवार म्हणाले की, "अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही." "आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत," असं शरद पवार यानी स्पष्ट केलं.
 
एकदा संधी दिली, परत संधी द्यायची नसते, मागायची नसते : शरद पवार
"फूट म्हणजे एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची नसते," असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार हे पक्षात परत येतील का प्रश्नाचं अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं.
 
बावनकुळे म्हणतात शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच भाजपला पाठिंबा देतील?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी अतिशय खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली. "माझी त्यांची फार ओळख नाही. अलिकडेच त्यांना ओळखतो. साधारण या पदावर राहणाऱ्या व्यक्तीला काहीतरी तारतम्य ठेवायची एक कल्पना असते. पण ते ज्या पद्धतीने बोलतायत, की आम्ही लोकांनी यांच्यावर टीका करु नये, त्यांच्यावर टीका करु नये. उद्या त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर टीका केली तर कदाचित ते म्हणू शकतात. पण जे आमच्या पक्षातील लोक जे सोडून गेले त्यांच्यावर टीका केली तर याची चिंता बावनकुळेंना का वाटते कळत नाही. त्याबाबत यांचं मार्गदर्शन आम्ही मागितलं नाही. याचा अर्थ ते जे बोलतात त्यामध्ये तारतम्य नाही, ज्याच्या बोलण्यात तारतम्य नाही, त्याला फारसं एन्टरटेंट करु नये," असं शरद पवार म्हणाले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्थिर, अर्थसंकल्पात दिलेल्या सवलती निवडणूक नौटंकी नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

कांद्याच्या दरावर सरकार पकड घट्ट करणार, अनेक शहरांमध्ये कांद्याने 50 रुपयांचा टप्पा ओलांडला

Porsche car Accident Case : पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट,अल्पवयीन आरोपीने रस्ता सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिला

बजाजची जगातील पहिली CNG बाईक लाँच, किंमत जाणून घ्या

NEET PG : NEET-PG परीक्षेची तारीख जाहीर,ऑगस्ट मध्ये या दिवशी होणार परीक्षा

पुढील लेख
Show comments