Festival Posters

शिंदे गटाने पाठिंबा काढला; ठाकरे सरकार अल्पमतात

Webdunia
सोमवार, 27 जून 2022 (14:59 IST)
शिवसेनेच्या 38 बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आलं आहे, असा दावा शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. शिंदे यांच्या याचिकेवर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
 
शिवसेनेनं 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. 48 तासात नोटीशीला उत्तर दिलं नाही, तर त्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. या नोटीशीला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर आता सुनावणी होणार आहे. बंडखोर आमदारांच्या गटाने ठाकरे सरकारचा पाठींबा काढल्याचे शिंदे गटाने जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. विधानसभा उपाध्यक्षांना आता कोणत्याही बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई करता येणार नाही, असेही शिंदे गटाने याचिकेत म्हटले आहे. अल्पमतात आलेलं सरकार सत्ता टिकवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकाराचा गैरवापर केला जात आहे,’ असा आरोपही शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

"राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातील एक नाकारलेली वस्तू," असे मुख्यमंत्री फडणवीस का म्हटले?

LIVE: महाराष्ट्र तीव्र उष्णता आणि जीवघेण्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी सुरक्षा रक्षक श्याम सोनावणे यांना बडतर्फ केले

Update in Nashik TCS case टीसीएस आरोपी निदा खानला न्यायालयाने १४ दिवसांच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पाठवले

महाराष्ट्रात भीषण उष्णतेची लाट; विदर्भात ६ जणांचा मृत्यू; प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घरातच राहण्याचा सल्ला दिला

पुढील लेख
Show comments