rashifal-2026

शिर्डी : रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार

Webdunia
गुरूवार, 22 जून 2017 (11:58 IST)

शिर्डीत येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरातील हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय मागील काळात घेतला होता. परंतु, साईभक्तांची गैरसुविधा टाळण्यासाठी रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हा निर्णय लागू करावा, अशी मागणी शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांनी शासनाच्या लोकप्रतिनिधींकडे केली होती. परराज्यातून येणा-या भाविकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे भाविकांना अनेक संकटांना तोंड देऊन उपाशीपोटी रहावे लागत होते. सदरची  अडचण लक्षात घेऊन गृह विभागाचे कक्ष अधिकारी शशांक सावंत यांनी नव्याने परिपत्रक काढले आहे. हॉटेल आस्थापनासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक तत्त्व आणि वेळेची नियमावली काढली आहे. त्यानुसार शिर्डीत रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून, यामध्ये फक्त खाद्यपदार्थ पुरविण्याची अट परवानगी टाकण्यात आली आहे. पुढील एक तास आवरासावर करण्यासाठी दिला असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. रात्री साडेबारापर्यंत हॉटेल बंद करण्यात यावे, असा अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयामुळे शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीड जिल्ह्यात नववीच्या एका विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments