Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साई चरणी 14 कोटीचे दान जमा

Webdunia
शिर्डी येथे 23 डिसेंबर 2017 ते 1 जानेवारी 2018 या काळात नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त सुमारे 9 लाख भक्तांनी साईदर्शन घेतले. दरम्यान, या कालावधीत सुमारे 14 कोटी 82 लाखांचे  दान साईचरणी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.  शिर्डीमध्ये 22 डिसेंबर ते 1 जानेवारी याकाळात 1 लाख भाविकांनी सशुल्क दर्शन पासेसचा लाभ घेतला. या कालावधीत रोख रकमेसह सोने-चांदी, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन, चेक-डीडी, मनीऑर्डर व परकीय चलन देणगी स्वरुपात 14 कोटी 82 लाखांचे  दान प्राप्त झाले.
 
यामध्ये दक्षिणा पेटीमध्ये 8 कोटी 34 लाख, देणगी काऊंटर 3 कोटी 8 लाख 29 हजार, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे 1 कोटी 27 हजार, ऑनलाईनद्वारे 64 लाख 23 हजार, चेक-डीडीद्वारे 86 लाख 12 हजार, मनीऑर्डरद्वारे 10 लाख 2 हजार रुपये, अशा देणगीचा समावेश आहे. यामध्ये 1177.170 ग्रॅम सोने व 19,955 ग्रॅम चांदीचाही समावेश आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाळ, ओमान, कुवैत, केनिया, मॉरिशस, व्हिएतनाम, थायलंड, अरब अमिरात, कतार, चीन व जपान अशा 21 देशांतील साईभक्तांनी अंदाजे 41 लाख 22 हजार रुपये किंमतीचे परकीय चलन संस्थानच्या दक्षिणा पेटीत टाकले आहे.
 
या कालावधीत श्री साईबाबा संस्थानच्या श्री साई प्रसादालयात 6 लाख 59 हजार 380 साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर 1 लाख 24 हजार भाविकांनी नाश्ता पाकिटाचा लाभ घेतला. या कालावधीत दर्शन रांगेमध्ये 9 लाख 14 हजार भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला असून, 5 लाख 66 हजार 900 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली आहे. त्यातून संस्थानला 1 कोटी 41 लाख 72 हजार 500 रुपये प्राप्त झाले आहेत. याकाळात श्री साईबाबा संस्थान प्रकाशित 55 हजार 432 दैनंदिनींची विक्री झाली असून, दिनदर्शिका व इतर साहित्यांद्वारे 88 लाख 40 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. लाडू, दैनंदिनी, दिनदर्शिका इत्यादींची विक्री ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर केली जात असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments