Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना खासदार भावना गवळी यांना चिकनगुनिया ईडी चौकशीसाठी गैरहजर

Webdunia
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:17 IST)
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. त्यांना चिकनगुनियाची लागण झाली असून त्यांनी १५ दिवसांचा अवधी ईडीकडे मागून घेतला आहे. भावना गवळी यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावला असून  त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
 
भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथीत गैरव्यवहाराप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. याआधीसुद्धा भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, त्या गैरहजर राहिल्या. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावत आज ईडी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, देखील गैरहजर राहणार आहेत. चिकनगुनियाची सबब देत त्यांनी १५ दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये बदल करुन कंपनीत रुपांतर केल्याप्रकरणी संचालक सईद खानला ईडीने अटक केली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

LIVE: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार,महायुतीची मोठी बैठक उद्या

धक्कादायक !सावत्र आईला 'मम्मी' न म्हणल्याने वडिलांनी केली मुलाची हत्या

मुंबईतील डोंगरीच्या बहुमजली इमारतीला भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही

पुढील लेख
Show comments