Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून 'हे' व्हॅलेंटाइन गिफ्ट असल्याचा नितेश राणे यांचा टोला

Webdunia
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (16:43 IST)
भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्हॅलेंटाइन डे निमित्त व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना आमचं जुनं प्रेम असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान वैभववाडी येथील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे आपलं व्हॅलेंटाइन गिफ्ट असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ पोस्ट केला आहे.
 
 भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले आहेत की, “मीदेखील बातमी वाचली आहे. व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारसुद्धा मिळणार नाही अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. आमच्या हृदयात बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची भावना आहे. म्हणून हे सात नगरसेवक व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे”.
 
“मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सहीसाठी फोन केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर त्यांनी सही केली. आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही. त्यांना काही दिलं तरी ते घेणार नाहीत. पुष्पगुच्छही स्वीकारणार नाहीत, म्हणून हे सात नगरसेवक आम्ही आभार मानण्यासाठी पाठवत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींना आणि शिवसेनेला मनापासून शुभेच्छा देतो,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments