बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण होत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय.
सरकारनं कोरोना नावाचं प्रकरण संपवून टाकलंय. एक मंत्री, ३ खासदारांचे निधन झाल्यानं संसद अधिवेशन गुंडाळल्याचे राऊत म्हणाले.
दुसरीकडे शिवसेना बिहार निवडणूक लढण्याबाबत विचार करेल. बिहार निवडणूक लढवण्यासंदर्भात उद्धव ठाकरे २-३ दिवसांत निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये लोकांना फक्त काळी शाई लावून घ्यायची नाही असेही राऊतांनी स्पष्ट केले. लालू यादव तुरूंगात असले तरी इस्पितळात आहेत. परिस्थिती योग्य आहे का, हा प्रश्न आहे. बिहारमध्ये जातीपातीवर निवडणूक होते, कृषी किंवा कामगार विधेयकावर होणार नाही. बिहारमधील कोरोना संपला का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सुशांत सिंह राजपूत हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असावा, यासाठीच मुंबईत इतकं राजकारण केलं. कामाचे,विकासाचे मुद्दे नसल्यानं मुंबईतले मुद्दे प्रचारात आणले जातायत असा टोला राऊतांनी लगावला. तिथले पोलीस प्रमुख बक्सरमधून लढतायत. जे नाट्य लिहले गेलंय त्यानुसार पुढं जातंय. मारूती कांबळेचे काय झालं त्याप्रमाणे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे काय झालं, असं विचारावं लागेल असे राऊतांनी म्हटलं.